सातारा, दि. १४ : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा कार्यालयाच्या वतीने घेतलेल्या शालेय जलतरण स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वडूथ विद्यालयातील विद्यार्थिनी कस्तुरी अमोल साबळे हिने १०० मीटर बेस्ट स्ट्रोक, २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, २०० मीटर वैयक्तिक मिडले या तिन्ही वैयक्तिक खेळ प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच ४ x १०० फ्री स्टाइल रिले व ४ x १०० मिडले रिले या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. तिची विभागस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कस्तुरीला प्रशिक्षक विजय साबळे, साबळे परिवार वडूथ, सुधीर चोरगे, महेश मिलके, गौरी मिलके यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.