सातारा शहर परिसरातून 2 दुचाकी चोरीस

by Team Satara Today | published on : 05 December 2024


सातारा : सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी 2 घटनांमध्ये 2 दुचाकी चोरुन नेल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिली तक्रार शैलेंद्र मधुकर गायकवाड (वय 52, रा. मंगळवार पेठ) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एमएच 11 सीझेड 0057 या क्रमांकाची दुचाकी मंगळवार पेठेतून चोरी झाली आहे.

दुसरी घटना यादोगोपाळ पेठेत घडली आहे. अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीझेड 4536 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 2 डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी मंदार मुकुंद ताथवडेकर (वय 40, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा
पुढील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या