सातारा-रहीमतपूर रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 02 April 2026


​सातारा: सातारा ते रहीमतपूर दरम्यान असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर जैतापूर गावच्या हद्दीत १ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनिल रंगनाथ बाबर (वय ४५, रा. जैतापूर) असे मृताचे नाव आहे.

​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संशयित चालक यश रवींद्र वायकर (वय २४, रा. रेवली, ता. खटाव, जि. सातारा) हा त्याच्या ताब्यातील 'हॅार्ली डेव्हिडसन X440' (क्रमांक MH 03 FA 8886) या दुचाकीवरून सातारा-रहीमतपूर रस्त्याने चालला होता. जैतापूर गावच्या हद्दीत आला असता, चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन अतिवेगात, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवले. यादरम्यान त्याने समोरून जाणाऱ्या सुनिल बाबर यांना जोरदार धडक दिली.

​या भीषण धडकेत बाबर यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात संशयित चालक यश वायकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गुरव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुन्या वादातून कोडोलीत घरावार दगडफेक; मायलेकासह तिघे जखमी
पुढील बातमी
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; सोनगाव परिसरातील घटना

संबंधित बातम्या