09:02pm | Jul 13, 2023 |
सातारा : नवामळा, ठाकुरकी येथील एकाने खाजगी सावकाराकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी व झालेल्या शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात खाजगी सावकार व त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 10 रोजी दुपारी 12 ते दिनांक 11 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान वेळोवेळी नवामळा ठाकुरकी ता. फलटण येथे फिर्यादी संतोष किसन शिंदे (रा. नवामळा ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) यांना हार्वेस्टिंग मशीनची दुरुस्ती व मजुरांचे पगार करता पैशाची आवश्यकता असल्याने शिंदे यांनी शामराव शंकर निंबाळकर रा. अलगुडेवाडी, ता. फलटण यांच्याकडून मासिक 10 टक्के व्याजाने 1 लाख 85 हजार रुपये एवढी रक्कम घेऊन त्याचे मोबदल्यात फिर्यादी व फिर्यादी यांची पत्नीचे नाव असणारे पत्रावजा घर अकरा महिन्यांचे लिव्ह अँड लायसन्स करार करून 6 लाख रुपये डिपॉझिट स्वीकारून दर महिना दोन हजार रुपये लायसन्स फी अशी नोटरी करून घेतली. व्याजाच्या आणि मुद्दलाच्या मोबदल्यात शिंदे यांनी वेळोवेळी 2 लाख 45 हजार रुपये देऊन देखील व्याज व मुद्दल आणखी 6 लाख द्यावे लागतील, याकरिता वारंवार तगादा लावून शामराव व त्याची पत्नी (नाव माहित नाही) यांनी शिंदे यांच्या घरी येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच शिंदे यांनी याबाबत फलटण शहर पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दिल्यानंतर शिंदे यांच्याकडून घेतलेल्या चेक वरती व्याज मुद्दलाची 6 लाख रुपये अशी रक्कम टाकून निंबाळकर यांनी चेक बाउन्स करून घेतला. याबाबत शिंदे यांनी त्यांना विचारले असता निंबाळकर यांनी शिंदे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली म्हणून शिंदे यांनी शामराव शंकर निंबाळकर व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |