विधानसभा निवडणुकीसाठी 14 नामनिर्देशनपत्रे दाखल

by Team Satara Today | published on : 26 October 2024



सातारा : विधानसभा निवडणूक 2024 साठी  12 उमेदवारांची 14  नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये 258- माण मध्ये 3 उमेदवारांची  3 पत्रे, 260- कराड दक्षीण 2 उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे आणि 262- सातारा दोन उमेदवारांची  2 नामनिर्देशनपत्रे , 257-कोरेगाव 2 उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे, 255-फलटण 1 उमेदवाराचे 3 नामनिर्देशन, 256-वाई 2 उमेदवारांचे 2 नामनिर्देशनपत्र,  अशी एकूण 12 उमेदवारांची 14 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. दि. 22 ऑक्टोंबर पासून आजअखेर 39 उमेदवारांची 47 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. 258- माण विधानसभा मतदार संघातून 3 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये बजरंग रामचंद्र पवार अपक्ष, प्रसाद मल्हारराव उंबासे अपक्ष, महेश मारुती कर्चे यांचा समावेश आहे.260- कराड दक्षीण मतदारसंघामध्ये  मतदारसंघामध्ये 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये विद्याधर कृष्णा गायकवाड बहुजन समाज पार्टी, गणेश शिवाजी कापे अपक्ष262- सातारा  मतदारसंघामध्ये 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये दादासो वसंतराव ओव्हाळ अपक्ष, हणमंत देविदास तुपे अपक्ष 257- कोरेगाव मतदार विधानसभा मतदार संघात  2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. चंद्रकांत जाणू कांबळे वंचित बहुजन आघाडी, दादासो वसंतराव ओव्हाळ अपक्ष255- फलटण मतदार विधानसभा मतदार संघात एका उमेदवारांनी तीन नामनिर्देशपपत्र दाखल केले आहे यामध्ये दिपक प्रल्हाद चवहाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरचंद्र पवार256- वाई मतदार विधानसभा मतदार संघात  2 उमेदवारांनी 2 नामनिर्देशपपत्र दाखल केले आहे यामध्ये प्रदिप रामदास माने अपक्ष, विनय अबुलाल जाधव अपक्ष 261- पाटण, 260 कराड उत्तर   विधानसभा मतदार संघाची आकडेवारी निरंक आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विकास केला तर मतदारांना अमिष का दाखविता?
पुढील बातमी
छत्रपती शिवाजी संग्रहालयात सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

संबंधित बातम्या