सातारा : सचिन रामेश्वर पिसे (रा. वाळूज एमआयडीसी, ता.गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याने डंपरचे आतापर्यंतचे १० हप्ते असे मिळून ४ लाख २७ हजार रुपये रक्कम न भरता ते थकवले असून याबाबत पैसे भरण्यासाठी वारंवार त्यास फोन केला. मात्र, तो फोन उचलत नसल्याने त्याने डंपरचा व्यवहार हा केवळ फसवण्याच्या उद्देशाने केलेला असून त्याने हप्त्याचे पैसे न भरता फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात बांधकाम व्यवसायिक सागर संतोष धोत्रे (वय ३४ रा. करंजे, ता.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सचिन पिसे याच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करत आहेत.
डंपरच्या हप्त्याचे पैसे न भरता फसवणूक केल्याप्रकरणी एकावर दाखल
by Team Satara Today | published on : 23 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा