सातारा : मोकळ्या जागेत पार्क केलेल्या कारवर दगड मारुन काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अशोक कुंडलिक खाडे, राज दास (दोघे रा. क्षेत्रमाहुली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 2 जुलै रोजी क्षेत्रमाहुली परिसरात घडली आहे. याप्रकरणी अण्णा शिवाजी पवार (वय 59, रा. क्षेत्रमाहुली) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.