सातारा : पाण्यात बुडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास मुकुटराव भिकू नलगे (वय 67, रा. आरफळ, ता. सातारा) हे कृष्णा नदीमध्ये गुरे धूवत असताना पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने पाय घसरून ते पाण्याच्या डोहात पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.