शाहरुख खाने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आणि पात्रे साकारण्याची केली इच्छा व्यक्त

by Team Satara Today | published on : 17 October 2024


मुंबई : बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने 2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारखे हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं आहे. शाहरुख खान नेहमी त्याच्या अभिनयाने आणि चित्रपटांच्या निवडीने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत असतो. तो सतत चाहत्यांसाठी वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट घेऊन येत असतो. सध्या शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

नुकतेच अभिनेता शाहरुख खानने सांगितले आहे की त्याला कोणती भूमिका करायला आवडते. लोकार्नो मीट्स पॉडकास्टवर शाहरुख खानने अभिनयाकडे पाहण्याचा त्याच्या दृष्टिकोनावर चर्चा केली आहे. ज्यामध्ये तो म्हणाला की, त्याचे कार्य प्रेक्षकांना पात्रावर विश्वास ठेवण्याचे आहे. स्वत: वर विश्वास ठेवणे नाही.

शाहरुख खान म्हणाला की, भावनिक दृश्य केल्यानंतर तो अनेक दिवस त्याकडे लक्ष देत नाही. त्याऐवजी त्याने यशस्वीपणे भावना व्यक्त केल्या आहेत आणि प्रेक्षकांशी जोडले आहे की नाही यावर तो लक्ष केंद्रित करतो.

शाहरुख खाने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका आणि पात्रे साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर नायकांचे चित्रण करणे आवडते. परंतु त्याच्या अभिनयात नवीन मार्ग शोधण्यास तो उत्सुक आहे. अलीकडेच त्याने खलनायकाची भूमिका साकारण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

या भूमिकेकडे आपला नवीन दृष्टीकोन आहे. गेल्या वर्षी अॅक्शन सीक्वेन्सचे प्रयोग केल्यानंतर त्याला आता किलरची भूमिका करायची आहे. शाहरुख खानच्या मनात रोज अनेक नवनवीन कल्पना येत असतात. ज्याची त्याला आता अंमलबजावणी करायची आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार
पुढील बातमी
सज्जनगडावरील तटबंदीचा आणखी एक भाग ढासळला

संबंधित बातम्या