सातारा : युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे आयोजन करते, त्यानुसार सन २०२५-२६ मधील राष्ट्रीय युवा महोत्सव माहे जानेवारी, २०२६ मध्ये दिल्ली येथे करण्यात येणार असून, यावर्षी युवा महोत्सव विकसित भारत २०४७ या दृष्टीकोनाशी जोडण्यात आलेला आहे.
त्यानुसार जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) बाबींमध्ये स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १२ जानेवारी, २०२६ रोजी वयाची १५ ते २९ परिगणना असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपली प्रवेशिका, सहभागी स्पर्धकाच्या जन्माचा सबळ पुरावा, संपर्क क्रमांक, संपूर्ण पत्त्यासह दिनांक १० नोव्हेंबर, २०२५ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे.