एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परिक्षेचा निकाल १००%

परीक्षेत कु. समिक्षा रजिश सकुंडे राज्यात ७७ वा क्रमांक

by Team Satara Today | published on : 07 February 2025


सातारा : महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई यांच्यावतीने एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परिक्षा सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आल्या. सदर परिक्षेस के. एस. डी. शानभाग विद्यालयातील १९५ विद्यार्थी बसले होते. दोन्ही परिक्षेचा निकाल १००% लागलेला आहे. 

'अ' श्रेणीमध्ये २८ विद्यार्थी व श्रेणीत 33 विद्यार्थी आणि 'क' श्रेणीमध्ये १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत इ. ८ वी अ मधील विद्यार्थीनी कु. समिक्षा रजिश सकुंडे हिने राज्यात ७७ वा क्रमांक मिळवला.

सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक दिपीका शिंगटे व गौरी नलावडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे  संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संस्थेच्या संचालिका सौ.आंचल घोरपडे, विश्वस्त सौ.उषा शानभाग , माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, पालक व सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील मुद्रांक विक्रेत्यांचे अतिक्रमण !
पुढील बातमी
राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला साताऱ्यात जोडे मारो आंदोलन

संबंधित बातम्या