राज्यात पुढील ६ दिवस धोक्याचे? मुसळधार पावसाचा इशारा

ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 27 September 2025


मु़ंबई : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अशातच पुढील सहा दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत राज्यातील हवामान कसे असेल याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

आजपासून दसऱ्यापर्यंतच्या पुढील ६ दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दसऱ्यापर्यंतच्या सहा दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट व ठळक आकारात रुपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे आज (शनिवारी 27 ला) सकाळ पर्यंत हवेच्या तीव्र  कमी दाबात रुपांतराची व चंद्रपूर हिंगोली पैठण अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमनाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून म्हणजे शनिवार दिनांक 27 सप्टेंबर पासुन दसऱ्यापर्यंतच्या 6 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 

मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज शनिवार (दि. २७) पासुन दसऱ्यापर्यंतच्या ६ दिवसात  संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात उद्या अतिजोरदार पाऊस मुंबई, ठाणे, रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात होणार आहे. रविवार (दि. २८) पासून मंगळवार दि.३० पर्यंत नाशिक, मुंबई,पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग  छ. सं. नगर व पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा भागात पाऊस होणार आहे, असे ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर पासुन पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडीपीची शक्यता जाणवते, असेही  खुळे यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुसेगावमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ चा थरार; दोघां दुचाकीस्वारांना ओमनीने उडवले
पुढील बातमी
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबीर व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

संबंधित बातम्या