तुम्हाला प्लॉट विकायचा नाही असे म्हणत साताऱ्यात महिलेला शिवीगाळ, दमदाटी; तिघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 February 2026


सातारा  : राजसपुरा पेठ येथील प्लॉट विकत घेण्यासाठी ऍग्रिमेंट केले होते. त्यासाठी तबस्सुमम मुल्ला (वय ४८, रा. प्रथमेश रचना अपार्टमेंट एसटी स्टँड पाठीमागे सातारा) यांनी तीस हजार रुपये खर्च केला होता. त्यानंतर त्यांनी प्लॉट खरेदी पत्र करण्यासाठी महेश खलाते, प्रशांत चोरगे आणि जयेंद्र जाधव यांना फोन केला असता त्यांनी फोनवर आम्हाला तुम्हाला प्लॉट विकायचा नाही असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तबस्सुमम मुल्ला यांनी तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगर येथून महिला बेपत्ता झाल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरीतील एकाविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या