सातारा : उसाला आग लावून शेतकर्याचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवथर ता.सातारा येथे शेतातील उसाला अज्ञाताने आग लावल्याने सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. राजेंद्र प्रताप साबळे (वय 58, रा. शिवथर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 10 नोव्हेबर रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.