काश्मिर : दक्षिण काश्मिरातील कोकेरनागमध्ये गडोल जंगलात लष्कारचे दोन जवान बेपत्ता झाले आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर लष्कराने त्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. लष्कर, पोलिसांचा सर्च ऑपरेशनमध्ये समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. जवान ६ ऑक्टोबर रोजी जंगलात बेपत्ता झाले. दोन्ही जवान निमलष्करी दलात कार्यरत असून, ते अग्निवीर आहेत.
दोन्ही जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने सूत्रे हलवली. स्थानिक पोलीस आणि लष्करी जवानांना पाचारण करण्यात आले. संयुक्त पथकांनी जंगलात शोध मोहीम सुरू केली.
दोन्ही जवानांच्या बेपत्ता होण्यामागे कोणतेही दहशतवादाचे कनेक्शन नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शोध मोहीम सुरू असतानाच दोन्ही जवान ग्रुपमधून मागे राहिले आणि रस्ता भरकटले असावे, अशी माहिती दिली गेली आहे.
किश्तवाड आणि अनंतनाग या दोन्ही शहराच्या मध्ये गडोल जंगलाचा भाग येतो. दोन्ही जवानांचा शोध सुरूच असून अद्याप जवानांचा ठिकाणा सापडलेला नाही.