सातारा : सातारा शहर परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाया केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मीटेकडी, सातारा येथे जुगार प्रकरणी उत्तम कल्याण दंडगुले (रा.लक्ष्मीटेकडी, सदरबझार) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 400 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
दुसरी कारवाई संतोष रामचंद्र आवळे (रा.सदरबझार) याच्यावर करुन पोलिसांनी रोख 400 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. बेडकरकनगर, सातारा येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तिसरी कारवाई उत्तम अंकुश कणसे (वय 57, रा. कोडोली, सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 660 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. कोडोली येथे ही कारवाई करण्यात आली आहे.