सातारा : हजारमाची (सदाशिवगड) या ग्रामपंचायतीला जिल्हा प्रशासनाने तातडीने महसुली दर्जा देऊन त्याबाबतची अधिसूचना काढावी, या मागणीसाठी सदाशिवगड ग्रामस्थांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनांमध्ये हजारमाची ग्रामपंचायत सरपंच निर्मला झुरगे कल्याणराव डुबल यांच्यासह अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत सदाशिवगड महसुली गाव जाहीर करन्याबाबतची अधिसूचना जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध करणे हजार मागची तलाठी कार्यालय या ग्रामपंचायतीच्या नूतन इमारती स्थलांतरित करणे अशा यांच्या मागण्या आहेत. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिलेले आहे.
विश्व इंडियन पार्टी मानवाधिकार संघटना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शेतकरी संघटना, मराठा महासंघ इत्यादी संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्हा प्रशासनाचा निषेध केला आहे.सदाशिव गडाला महसुली गावाचा दर्जा मिळणे बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी व तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे अंदाजपत्रक तयार करणे बाबतची कागदपत्र सादर करण्यास विलंबाने टाळाटाळ होत आहे, अशी आंदोलकांची मागणी आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने यातून मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा ठिय्या आंदोलन अधिक तीव्र पद्धतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.