11:44am | Mar 05, 2024 |
सातारा : सातारा जिल्हा परिषद परिसरातील जुनी जिल्हा लोकल बोर्ड इमारत वारसा स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपूजन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, रविराज देसाई, जयराज देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनिल काटकर, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी राहूल कदम, प्रकल्प संचालक डी. आर.डी.ए संतोष हराळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन घुले, अर्चना वाघमोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्हा परिषद स्थापन होण्यापूर्वी ग्रामीण क्षेत्राशी संबंधित विकास कामांशी अंमलबजावणी जिल्हा लोकल बोर्डामार्फत केली जात होती. सन 1941-1952 या कालावधीत सलग 123 वर्षे लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. दिनांक 27 जून 2019 रोजी जुनी इमारत याचा समावेश वारसा स्थळ जतन समिती मार्फत हेरिटेज श्रेणी ब मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
सदयस्थितीत या वास्तुमध्ये जिल्हा परिषद उपहारगृह, जि.प.सेवकांची आर्थिक सहकारी पतपेढी, जिल्हा गुण नियंत्रण प्रयोगशाळा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, यांत्रिकी उपविभाग सातारा,अभिलेख शाखा, आधारकार्ड सेतू कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अशी विविध कार्यालये कार्यरत आहेत.
पुर्वीप्रमाणे इमारतीच्या ज्या भागात सभागृह होते त्या ठिकाणची कार्यालये इतरत्र स्थलांतरित करुन सदरची वास्तु वारसा स्थळ जतन समितीच्या नियमावलीप्रमाणे जतन करणे आवश्क आहे, यासाठी या वास्तुला वारसा स्थळ म्हणून जतन करण्यात येणार आहे. या कामाचा शुभांरभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते झाला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |