भारताचा सामना सध्या बांग्लादेशविरुद्ध सुरु आहे, यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये दमदार कामगिरी करत ३७६ धावा केल्या आहेत. भारताचे स्टार फलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी खेळ सांभाळून भारताला अडचणीतून बाहेर काढले. आता भारताचा संघ पहिल्या इनींगची गोलंदाजीला सुरुवात केली आहे. यामध्ये भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कमाल केली आणि शादमान इस्लाम याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. त्यानंतर भारतीय संघाचा नवा गोलंदाज आकाशदीपने तर त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कमाल करूनच दाखवली आहे. त्याने त्याच्या एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स नावावर केल्या आहेत.
आकाशदीपने झाकीर हसनचा पहिला विकेट घेतला. झाकीर हसनने संघासाठी फक्त ३ धावा केल्या आणि आकाशदीपचा बळी ठरला. मोमिनुल हक हा आकाशदीपचा दुसरा बळी ठरला. लंच ब्रेकपर्यंत बांग्लादेशने पहिल्या डावात ३ गडी गमावून २६ धावा केल्या होत्या. नजमुल १५ धावा करून नाबाद आहे. तर मुशफिकुर रहीम ४ धावा करून नाबाद आहे. भारताकडून आकाश दीपने २ बळी घेतले. जसप्रीत बुमराहला यश मिळाले आहे. आता भारताचा फिरकी गोलंदाज कोणती कमालीची कामगिरी करतात यावर प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत. तीनही फलंदाज हे स्टॅम्प आऊट झाले आहेत.
बीसीसीआयने आकाश दीपच्या गोलंदाजीचा व्हिडिओही शेअर केला आहे. विकेट घेतल्यानंतर आकाश दीप मनोरंजक पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसला. चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत त्याने फक्त २ षटके टाकली. यादरम्यान त्याने ५ धावांत २ बळी घेतले. जसप्रीत बुमराहने ३ षटकात १० धावा देत १ बळी घेतला. मोहम्मद सिराजने ३ षटकात ६ धावा दिल्या आणि १ मेडन षटकात रविचंद्रन अश्विनने ४ धावा दिल्या.