शिरवळ, दि. १७ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ या ठिकाणी मंगळवारी (दि.16) भरदिवसा बाजारपेठेत गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने शिरवळ व परिसरात खळबळ उडाली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 2016 मध्ये झालेल्या प्रतीक चव्हाण याच्या हत्येच्या रागातून हा हल्ला दाखल झाल्याचे सांगण्यात आले. काल झालेल्या हल्ल्यामध्ये रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (वय 40) हा युवक थोडक्यात बचावला.
2016 साली झालेल्या प्रतीक चव्हाण यांच्या खुनाचा राग मनात ठेवून साई धुमाळ व अक्षय उर्फ प्रेम वसगडेकर या दोघांनी दुचाकीवरून येवून अक्षय याने पिस्टलमधून जीवे मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केले. यासोबत अविनाश मोरे, रॉकी हरिदास बाला, सनी टापरे व रोहन गुजर यांनी हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून जीव मारण्याचा कट रचला , अशी फिर्याद रियाज शेख याने दिली आहे. यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे हे अधिक तपास करीत आहेत.