संभाजीनगर मध्ये घरफोडी

by Team Satara Today | published on : 09 December 2024


सातारा : संभाजीनगर, सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 ते 8 दरम्यान हरी गोपाळ पोरे रा. संभाजीनगर, सातारा यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील 56 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. अधिक तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलीसह विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
मानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या