सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला तरुण पुन्हा शहरात आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.
रोहित जितेंद्र भोसले (वय २४, रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा) याला सातारा पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र, तो प्रतापसिंह नगर खेडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आढळून आला. हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करत आहेत.