नवी दिल्ली : येत्या ३ महिन्यांत 'इस्रो'ची (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) गगनयान मोहिमेची पहिली मानवरहित मोहीम लाँच होणार आहे. 'इस्रो'त त्याच्या पूर्वतयारीचीच लगबग सुरू आहे. दुसरीकडे, 'इस्रो'ने पुढील १५ वर्षांत राबवायच्या मोहिमांच्या रोडमॅपवरही शेवटचा हात फिरवून झाला आहे. 'इस्रो'ने त्यासाठी ४० वर्षांचे कॅलेंडरही तयार केले आहे. त्यातून भारतीय अंतराळ मोहिमांबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे.
गगनयान काय ?
मानवरहित मोहिमेनंतर 'इस्रो' गगनयानातून 'व्योममित्र' नावाचा मानवसदृश रोबो पाठवणार आहे. एआयच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदतीने या 'व्योममित्र' रोबोचे वर्तन अगदी मानवाप्रमाणे असेल. २०२५ च्या अखेरीस अथवा २०२६ व्या सुरुवातीस तीन दिवसांच्या पृथ्वी परिक्रमेसाठी २ भारतीय अंतराळवीर पाठवण्याची 'इस्रो'ची योजना आहे. २०२९ पर्यंत ३ मानवी मोहिमा अंतराळात राबवल्या जातील. मोहिमेला प्राप्त यशाच्या आधारावर अंतराळ फेण्या व वीरांची संख्याही वाढवली जाईल.
सहा उपग्रह पाठवणार
• पुढच्याच वर्षी म्हणजे २०२५ मध्ये 'इस्रो' ६ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.
• नौदलासाठी जीसॅट-७ आर, लष्करासाठी जीसॅट-७ बी, ब्रॉडबैंड
आणि इन-फ्लाईट कनेक्टिव्हिटीसाठी जीसॅट-एन २.
• सुरक्षा दले, निमलष्करी 3 दले. रेल्वेसाठी जीसॅट- एन ३, गगनयानासोबत कनेक्टिव्हिटीसाठी २ उपग्रहही लाँच केले
जातील.
गगनयान काय ?
गगनयान या ३ दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीरांना पृथ्वीच्या ४०० कि. मी. वरील कक्षेत पाठवले जाईल आणि नंतर सुरक्षितरीत्या समुद्रात उतरवले जाईल. यात यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत असा चौथा देश ठरेल.
इस्रो'चे कॅलेंडर 2025 -
मनुष्य चंद्राच्या कक्षेत फिरून पृथ्वीवर परत येणार.
2027 - चांद्रयान-४ मिशन लाँच करणार, चंद्रावरून नमुने आणणार.
2028 - भारतीय अंतराळ स्थानकाचे मॉडेल-१ अंतराळात पाठवणार, स्वदेशी यान जोडणी प्रयोगही अंतराळात पार पडेल. अंतराळातच २ याने परस्परांना जोडली जातील.
2031 - चंद्रावर मानवी मोहीम.
2035 - अंतराळात भारताचे स्थानक उभारणार
2037 - भारतीय रोबो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार. शुक्रावर यान पाठवणार. 2040 - चंद्रावर भारतीय पाऊल उमटवण्याची योजना.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |