सातारा : दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगिकृत आणि अधिनियमित करुन सदरची राज्यघटना दि. 26 नोव्हेंबर 1950 पासून अंमलात आलेली आहे. सदर घटनेस 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल सर्व नागरिकामध्ये जागरुकता वाढविण्यासाठी बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.15 वाजता छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा, सातारा ते नगरपरिषद चौकामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा अशी संविधान दिंडी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त सुनील जाधव यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायीक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त अनुदानित /विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा अशा सर्व ठिकाणी विविध उपक्रम व कार्यक्रमांतर्गत दि. 20 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध स्पर्धा, कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हयातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायीक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त अनुदानित /विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्थामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे.
बुधवार, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8.15 वाजता छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा, सातारा ते नगरपरिषद चौकामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा अशी संविधान दिंडी आयोजित करण्यात आलेली आहे. सातारा शहरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व नागरीकांनी संविधान दिंडीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांनी केले आहे.