काँग्रेसचे जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी जनसुनावणी अभियान; ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 28 March 2026


सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसचे जन सुनावणी अभियानाचे आयोजन केले आहे .काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे जन सुनावणी अभियान दि. १  एप्रिल रोजी सकाळी दहा ते तीन यादरम्यान येथील जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये होणार आहे.

याबाबतची माहिती सातारा जिल्हा काँग्रेस महिला आघाडीचे अध्यक्ष सुषमा राजेघोरपडे व सातारा जिल्हा किसान काँग्रेस कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सादिक बागवान लक्ष्मण मोरे अवधूत निकम उपस्थित होते.

या जन सुनावणी आंदोलनाबाबत बोलताना वसीम इनामदार पुढे म्हणाले, 'ऊस बिलांच्या देयकासंदर्भात होणारी दिरंगाई वजनातील तफावत बेकायदेशीर कपात या विरोधात सातारा जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा काँग्रेसने विशेष जन सुनावणी अभियान घेतले आहे. ज्या शेतकऱ्यांना ऊस बिला संदर्भातील अडचणी येत आहेत त्यांनी काँग्रेस भवन कार्यालयात येऊन आपल्या तक्रारी या अभियानामध्ये नोंदवायच्या आहेत.

सुषमा राजेघोरपडे पुढे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यातील बळीराजा पर्जन्यमान अवकाळी पाऊस कधी दुष्काळ यामुळे आधीच अडचणीत असताना त्याला साखर कारखानदारांकडून जास्त अडचणीत आणले जात आहे. अशा शेतकऱ्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे कामाचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी प्रतीक्षा अत्यंत दुर्दैवी आहे काँग्रेस पक्ष व पक्षाचे सर्व सेल शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही दबावाला न घाबरता या जन सुनावणी अभियानामध्ये भाग घेऊन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात ऊस बिलाची दिरंगाई वजनातील फरक तसेच बिलामध्ये केली जाणारी बेकादेशीर कपात या विरोधात जन आंदोलन उभे केले जाणार आहे असा इशारा सुषमा राजे घोरपडे यांनी दिला. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेत ४ एप्रिलला सभापती निवडी; गोंधळाची पुनरावृत्ती आणि प्रशासनाची नामुष्की टाळण्याचे आव्हान
पुढील बातमी
साताऱ्यात निवृत्त शिक्षकाचा पोलिसांवर गंभीर आरोप; अन्याय, मारहाण व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

संबंधित बातम्या