सातारा : सातारा अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना राज्य शासनाकडून आदर्श अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाकडून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महसूल विभागात आदर्श कामगिरी करून आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यसरकारकडून सन्मानित करण्यात येते.
पुणे विभागातून साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना आदर्श अधिकारी पुरस्काराने यावर्षी सन्मानित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात आपल्या आदर्श कामाने जीवन गलांडे यांनी महसूल विभागात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा निमित्त त्यांचे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून श्री.गलांडे यांचे अभिनंदन होत आहे. पुणे विभागीय आयुक्त यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण पुणे येथे करण्यात येणार आहे.
अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे आदर्श अधिकारी पुरस्काराने सन्मानित
by Team Satara Today | published on : 14 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा