सातारा : वर्ये, ता. सातारा येथील महावितरण कंपनीच्या डीपी मधून सत्तर ते ऐंशी किलो तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. 26 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या नंतर घडली आहे.
याप्रकरणी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वसंत बाळासाहेब मोकाशी रा. खंडाळा, यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तांब्याच्या तारेची किंमत 28 हजार रुपये इतकी आहे. चोरट्याने विजेच्या डीपी मधील तांब्याची तार चोरून नेल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करत आहेत.