अमेरिकेने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला दिला झटका 

चीन कंपन्यांवर अमेरिकेने लादले निर्बंध 

by Team Satara Today | published on : 16 September 2024


नवी दिल्ली : चीन आणि अमेरिकेत संघर्ष कायम आहे. यामुळे अमेरिकेने चीनविरोधात कठोर पावले उचलली आहेत. आता अमेरिकेने पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला झटका दिला आहे. पाकिस्तानी क्षेपणास्त्र प्रकल्पाशी संबंधित चीन कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले आहे. अमेरिकन क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यानुसार हे पाऊल उचलले आहे. यामुळे पाकिस्तानचा शाहीन-3 क्षेपणास्त्र प्रकल्पावर पाणी फिरले आहे. भारताच्या सर्व भागांत क्षेपणास्त्र पोहचू शकणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर पाकिस्तानचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

अमेरिकेकडून देण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, चीन संशोधन संस्थेवर निर्बंध आणण्यात आले आहे. या संस्था पाकिस्तानला क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी लागणारी उपकरणे निर्यात करत होत होती. चीनी संस्‍था पाकिस्‍तानच्या शाहीन-3 क्षेपणास्त्र, अबाबील सिस्‍टम आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रासाठी रॉकेट मोटर टेस्टिंग देत होते. पाकिस्तान शाहीण क्षेपणास्त्राचा 2750 किमी टप्पा असल्याचा दाव करत होता. हे क्षेपणास्त्र भारताच्या कोणत्याही टप्प्यात जाऊ शकतो, असे पाकिस्तान सांगत होता. परंतु आता पाकिस्तानचा हा प्रकल्पच गुंडळला जाणार आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, पाकिस्तानचे राष्ट्रीय विकास संकुल आणि बीजिंगच्या ऑटोमेशन फॉर मशीन बिल्डिंग संशोधन संस्थेमध्ये क्षेपणास्त्र विकास करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शाहीन-3 हे या मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्राचा विकास केला जाणार होता. पाकिस्तानच्या शस्त्रागारातील हे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. तसेच अबाबिल क्षेपणास्त्र 2200 किमीपर्यंत मारा करू शकते आणि त्याचे तीन टप्पे आहेत. त्यामुळे आता अमेरिकेने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मर्यादेत चीन आणि पाकिस्तानच्या अनेक कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र विकासाशी संबंधित चिनी संस्थांवर अमेरिकेने निर्बंध लादण्याची ही पहिलीच घटना नाही. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या कारवाईवर टीका केली आहे. चीनने या निर्बंधांचा निषेध केला आहे. चीनने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधाराशिवाय एकतर्फी निर्बंध स्वीकार्य नाहीत.

पाकिस्तानचे शाहीन-III हे दोन टप्प्याचे क्षेपणास्त्र आहे. मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते घन इंधनावर चालते. या क्षेपणास्त्राची पल्ला 2,750 किलोमीटर आहे. ते पारंपारिक आणि अण्वस्त्र दोन्ही वाहून नेऊ शकते. पाकिस्तान लष्कराच्या शस्त्रागारातील हे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मन:शक्ती ओळखण्याची दृष्टी देणाऱ्या रामदास स्वामींची कथा
पुढील बातमी
14 चौकार, 3 षटकार अन् खणखणीत शतक, इशान किशनने टीकाकारांना दोन शब्दांत दिले चोख प्रत्युत्तर

संबंधित बातम्या