पुणे : म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती टेनिस संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत बिगरमानांकीत वीरेन सूर्यवंशीने दुसऱ्या मानांकित आपला राज्य सहकारी सार्थक गायकवाडचा 6-3, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला.
महाराष्ट्राच्या दक्ष पाटीलने आठव्या मानांकित आदित्य अरुणचा 6-0, 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या वरद पोळयाने नीव गोगियाचा 6-1, 2-6, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. तेलंगणाच्या अंकित डिसूझाने महाराष्ट्राच्या श्लोक शर्माचा 6-4, 6-0 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मुलींच्या गटात सातव्या मानांकित आरोही देशमुखने समृद्धी मिरगेचा 6-2, 6-0 असा तर, जान्हवी चौगुलेने वीरा हरपुडेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. याआधी स्पर्धेचे उदघाटन माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणेच्या सारिका गडदे, केतकी जोगळेकर आणि आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकट कर आदी मान्यवर उपस्थित होते.