सातारा : अपघातात दुचाकीस्वारास जखमी केल्याप्रकरणी दुसर्या दुचाकी चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते अजंठा चौक या सेवा रस्त्यावर दुचाकींचा अपघात दि. 31 ऑक्टोबरला झाला होता. त्यात अक्षय संजीव जाधव (वय 24, रा. केसरकर पेठ, सातारा) हा जखमी झाला. त्याच्या फिर्यादीवरुन विक्रम आनंदराव शिंदे (वय 48, रा. देगाव रस्ता, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार कारळे तपास करत आहेत.