दुर्गा पेठेत सुमारे 28 हजारांची चोरी

by Team Satara Today | published on : 09 October 2024


सातारा : सातारा शहरातील दुर्गा पेठेत असणाऱ्या एका घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 28 हजारांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान लीला भीमसेन कांबळे रा. दुर्गा पेठ, सातारा यांचे पती थोड्या वेळासाठी घरातून बाहेर गेले असता अज्ञाताने घरातील 27 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश

संबंधित बातम्या