सातारा : आदर्की बुद्रुक, ता. फलटण येथील जागृत ग्रामदैवत कालभैरवनाथ यांचा श्री भैरवनाथ जयंती उत्सव सोहळा व रथोत्सव बुधवार, दि. २0 ते शनिवार, दि. २३ नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भैरवनाथ जयंती उत्सवाचे हे तिसरे आठवे वर्षे असून हा जयंती उत्सव सोहळा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री भैरवनाथ जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
श्री भैरवनाथ जयंती उत्सवाच्यानिमित्ताने बुधवार, दि. २0 रोजी आदर्की, कापशी शेरेचीवाडी, ढवळ, हिंगणगाव येथील भजनाचा कार्यक्रम, गुरुवार, दि. २१ रोजी रात्री ८ ते ९ श्रींची मंदिर प्रदक्षिणा, वाहन घोडा. रात्री ९ वा. पुणे जि.प.चे माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांचे 'चला आनंदाने जगूया' या विषयावर व्याख्यान. शुक्रवार, दि. २२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या दरम्यान तरडगाव येथील मुक्ताई महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, रात्री ८ ते ९ श्रींची मंदिर प्रदक्षिणा वाहन गरुड. रात्री ९ वाजता बजरंगवाडी पुणे येथील ह. भ.प. माधुरी पवार-लाटे यांचे किर्तन. शनिवार, दि. २३ रोजी दुपारी १२ ते १२.३0 श्री भैरवनाथ जन्मोत्सव, दुपारी १ ते ३ महाप्रसाद. दुपारी ३ वा. श्रींची रथातून मिरवणूक व प्रदक्षिणा होणार आहे.
श्री भैरवनाथ जयंती उत्सवामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन श्री भैरवनाथ जयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.