कराड : दक्षिण काशी म्हणून लौकिक असलेल्या कराडनगरीत अनेक देव-देवतांची मंदिरे असून, सण-उत्सवामध्ये त्या-त्या मंदिरांमध्ये उत्सव स्वरूपात कराडकर व पंचक्रोशीतील भक्तगण सण-उत्सव पार पाडत असतात.
नवरात्रात विशेषतः दैत्यनिवारणीला नित्याने जणू नियम म्हणूनच दर्शनासह आरती, पूजेला जाण्याचे महिला आणि युवतीवर्ग व्रत पाळतात. कृष्णामाईचे दर्शन घेणे व स्मरण करणे यालाही कराडकर व महिला प्राधान्य देत असतात.