सातारा : सामायिक जागेत घर बांधण्याच्या कारणावरून चुलत भावाने आपल्या दुसर्या भावाला हातातील काठीने बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक 22 जून रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी विशाल एकनाथ झेंडे वय 39 राहणार गुरसाळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पंचम नारायण झेंडे, प्रकाश नारायण झेंडे, सुशांत नारायण झेंडे, नंदनारायण झेंडे, सिंधुबाई नारायण झेंडे, सर्वजण राहणार गुरसाळे मेघा सतीश रायबोळे राहणार मुंबई या सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी व पंचम झेंडे यांच्यामध्ये सामायिक जागेचा वाद आहे घर बांधण्याच्या प्रक्रियेवरून फिर्यादीच्या घरात येऊन त्याला काठीने मारहाण केली तसेच लाथा बुक्क्यांनी फिर्यादीची आई आणि पत्नीला सुद्धा मारहाण करण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली आहे. या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत पोलीस हवालदार केके बोडरेअधिक तपास करत आहेत.