महायुतीवर चर्चा होईल, पण कराडचा नगराध्यक्ष महायुतीचा व्हावा : आ. अतुल भोसले ; मित्रपक्षांनी मदत करावी

by Team Satara Today | published on : 08 November 2025


कराड : कराड शहराने २०१६ च्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष निवडून दिला आहे. विधानसभेलाही शहरवासीयांनी मोठ्या अपेक्षेने मला आमदार केले. त्यामुळे कराडचा नगराध्यक्ष महायुतीचा व्हावा. गतवेळी भाजपचा नगराध्यक्ष असल्याने साहजिकच यावेळीही भाजपचाच उमेदवार असावा, त्यासाठी मित्रपक्षांनी मदत करावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी केले. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

आमदार भोसले म्हणाले, महायुती म्हणून पालिकांना निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात नगराध्यक्षपदावर भाजपचा दावा असेल. यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील नागरिकांनी भाजपचा नगराध्यक्ष निवडून दिला. विधानसभेलाही मला आमदार केले. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नगराध्यक्षपदासाठी भाजपचाच उमेदवार असावा यावार आम्ही ठाम आहोत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैनिक स्कूलच्या प्रवेश प्रक्रीयेस ९ नोंव्हेबर पर्यंत मुदतवाढ; इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला मुलींना सुवर्णसंधी
पुढील बातमी
इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखतींना भाजप करणार सुरवात : भाजप कार्यालयात होणार मुलाखती, स्थानिक समीकरणानुसार निर्णय,भाजप कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा

संबंधित बातम्या