जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 17 October 2024


सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट, वर्ये ता.सातारा येथे जुगार प्रकरणी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करुन गुन्हे दाखल केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट येथे शुभम सत्यवान कांबळे (वय 26, रा.विकासनगर, सातारा) याच्यावर कारवाई करत रोख 1250 रुपये जुगाराचे साहित्य जप्त केले.

दुसरी कारवाई वर्ये येथे शुभम उध्दव इंदलकर (वय 35, रा. कळंबे ता.सातारा) याच्यावर करुन पोलिसांनी रोख 610 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीएस मालिका सुरु

संबंधित बातम्या