मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 August 2024


सातारा : मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये महिलांचाही समावेश असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरात घुसून मारहाण तसेच घरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रुक्साना चंदनशिवे, तनुजा विकास चंदनशिवे, दिव्या अभिजीत खंडागळे, स्नेहल गवळी, गौतम चंदनशिवे, विकास चंदनशिवे, अभिजीत खंडागळे (पूर्ण नाव माहित नाही) सर्व रा. प्रतापसिंह नगर, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुरुष भिक्षेकरी गृहातून एकजण बेपत्ता 
पुढील बातमी
रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहात महिला बंदयांनी तयार केल्या राख्या

संबंधित बातम्या