स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे नायक : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत स्वच्छता कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

by Team Satara Today | published on : 30 September 2025


सातारा : स्वच्छता ही  सेवा या अभियानाअंतर्गत  जिल्हा परिषदेतील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे व वैद्यकीय अधिकारी डॉ.लिना बेंडाळे  यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 

यावेळी अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद शिर्के, डॉ. सुनील चव्हाण, डॉ बजरंग खा डे, स्टाफ नर्स सादिका मेस्त्री, शुभांगी बिलेवार,महा लॅब च्या मनीषा कवठेकर यांनी कर्मचाऱ्याची तपासणी केली.  

स्वच्छता ही सेवा 2025  या उपक्रमांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी यांचे  जिल्हा स्तरावर व तालुकास्तरावर आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्हास्तरावर 76 स्वच्छता कर्मचारी यांची तर  तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये 1227 कर्मचाऱ्याची आरोग्य  विषयक तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना मोफत औषध उपचार करण्यात  आले.  स्वच्छता कर्मचारी यांची वैयक्तिक आरोग्याची काळजी  घेतली पाहिजे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे नायक असून त्यांना त्या अनुषंगाने  सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ ही त्यांना देण्यात यावा. सर्व ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वच्छता कर्मचारी यांना स्वच्छतेची साधने  हॅंडग्लोज, टोपी, मास्क, बुट इ  साहित्य पुरवण्यात यावयात, अशा सूचना सर्व ग्रामपंचायतींना  याशनी नागराजन यांनी दिल्या आहेत.

हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी  जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे तज्ञ रविंद्र सोनावणे,अजय राऊत, ऋशिकेश शिलवंत, राजेश भोसले,गणेश चव्हाण,राजेश इंगळे,निलिमा सन्मुख, फिरोज शेख,साकेत महामुलकर, विशाल भिसे, सविता भोसले, कोमल पाटील,सचिन जाधव यांनी प्रयत्न केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुका रेशन दुकानदार संघटनेची पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत
पुढील बातमी
सातारची जनता बँक आता लवकरच पुणे जिल्ह्यात कार्यरत--विनोद कुलकर्णी

संबंधित बातम्या