वडूथ, वाढे पुलावर भर पावसात खड्डे भरण्यास सुरुवात

जड वाहतूक आता तरी बंद होईल का ? नागरीकांचा सवाल

by Team Satara Today | published on : 28 September 2025


सातारा  :  सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ आणि वाढे येथील पुलावर भले मोठे खड्डे पडले होते. या मार्गाच्या दुरुस्तीकरता सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी तात्काळ एनएचएआय (NHAI) प्रशासनाचे संपर्क साधल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामध्येच या मार्गाची परिस्थिती सुद्धा दयनीय झाली होती. पावसामुळे वाहनधारकांना मोठे कसरत करावी लागत होती. त्यामुळे दोन्ही पुलांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मदन साबळे यांनी रस्ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी गुरुवारी रात्रीच संपर्क करून पुलांची व मार्गाची परिस्थितीविषयी माहिती दिली.

त्यामुळे शुक्रवारी सकाळी रस्ते प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुलावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरू केले, तसेच पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी पुलावरील पाण्याचा निचरा होणाऱ्या छिद्रातून माती काढून ते मोकळे करण्यात आले. यावेळी वडूथ गावचे पोलीस पाटील संदीप माने यांनी रस्ते प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले.

या सर्व प्रश्नांना या भागातील सर्व गावच्या नागरिकांनी एकत्र येत आवाज उठवणे गरजेचे आहे. या मार्गावरील जड वाहतूक बंद करणे गरजेचे आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यासह जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी; माण, खटाव, फलटण भागात पावसाने जनजीवन विस्कळीत
पुढील बातमी
व्यापा-यांनी ओढ्यावर केलेल्या म्हसवड पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा

संबंधित बातम्या