शीख धर्माचे श्री गुरु तेग बहादुर यांच्या साडे तीनशेव्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी साताऱ्यात तयारी

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा : मानवी कल्याणासाठी झटणाऱ्या युगपुरुष व  गुरुजनांना वंदन करण्याची परंपरा जोपासणारी पवित्र भूमी म्हणजे सातारा भूमी. याच भूमीत आता शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या साडे तीनशेव्या शहीदी समागमाच्या कार्यक्रमासाठी साताऱ्यात जोरदार तयारी सुरू झालेली आहे. साताऱ्यातील गुरुद्वारामध्ये हा सोहळा साजरा करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनानेही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल १६२१ – नोव्हेंबर १६७५) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी  आध्यात्मिक व सांस्कृतिक इतिहासात धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सत्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली . त्यांच्या३५० व्या शहिदी समागमाच्या निमित्ताने

महाराष्ट्र शासनाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय तसेच जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे . सातारा जिल्ह्यातही स्थापन समितीमार्फत शीख बांधवांसोबत इतर जाती धर्मातील लोकही सहभागी होत आहेत. या समागमातील विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम हे केवळ स्मरणोत्सव नसून, मूल्याधिष्ठित राष्ट्रनिर्मितीचा संदेश देणारे ऐतिहासिक पर्व ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सांजवात संपादक घनश्याम छाबडा यांच्यासह सातारा जिल्ह्यात वास्तव करणाऱ्या अनेक शिख बांधवांनी व्यक्त केला आहे.

मानवतेसाठी बलिदान देणाऱ्या गुरू तेग बहादूर साहेब जी यांनी सर्व धर्मांच्या अस्तित्वासाठी आपले बलिदान दिले. जबरदस्तीच्या धर्मांतराविरुद्ध त्यांनी निर्भीडपणे आवाज उठवला. “तिलक, जनेऊ राखण्यासाठी" त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे भारतीय संविधानात अंतर्भूत असलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या मूल्यांचे मूर्त रूप मानले जाते. ३५० वा समागम श्रद्धा, सेवा आणि संकल्प देश-विदेशात साजऱ्या होत असलेल्या या ३५० व्या समागमामध्ये अखंड पठण, कीर्तन, गुरबाणी विचार, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, शैक्षणिक उपक्रम, स्वच्छता मोहीम व लंगर सेवा यांसारख्या उपक्रमांद्वारे

गुरु तेग बहादुर यांच्या विचारांची जनजागृती करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. अन्याय आणि धार्मिक असहिष्णुते विरुद्ध त्यांनी सर्व मानव कल्याणासाठी आवाज उठवला, ज्यामुळे त्यांना 'हिंद दी चादर' (हिंदुस्तानाचा संरक्षक) म्हटले जाते. त्यांनी औरंगजेबाच्या क्रूरतेचा सामना केला आणि धर्म आणि मूल्यांसाठी बलिदान दिले, त्यांच्या ११६ रचना 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट आहेत. गुरु तेग बहादुर यांचा  २१ एप्रिल १६२१, अमृतसर, पंजाब मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि पुढे १६६४ मध्ये गुरु हरकिशन यांच्या निधनानंतर त्यांना गुरू पदवी मिळाली. त्यांचे जीवन अन्यायविरुद्ध लढण्यासाठी एक प्रेरणा आहे. धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आणि नोव्हेंबर १६७५ मध्ये दिल्ली येथे त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या ११६ पदांमध्ये (५९ शब्द आणि ५७ श्लोक) वैराग्य आणि क्षमाशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार आढळतो, जे गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांचे पुत्र, गुरु गोबिंद सिंग, हे शीख धर्माचे दहावे आणि अंतिम गुरू बनले. मानव कल्याणासाठी झटणारे व त्यासाठी बलिदान देणारे गुरु तेग बहादुर म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. सातारा जिल्ह्यात अनेक शीख बांधवां समवेत त्यांचे यानिमित्त स्मरण केले जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्ञानार्जनाबरोबर कला, क्रीडा कौशल्य आत्मसात करावीत - सौ. वैशाली क्षीरसागर; नूतन मराठी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
पुढील बातमी
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने एक खिडकी योजना सुरू - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या