सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात शिक्षणासाठी वास्तव्य करत असलेल्या अल्पवयीन मुलीची ओळख झाल्यानंतर त्या ओळखीचा गैरफायदा घेवून वारणानगर, जि. कोल्हापूर येथील संशयिताने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. संशयिताने मुलीला थारमध्ये बसवून जबरदस्तीने तिला आयफोन दिला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
अनिल विष्णू कोकाटे-पाटील (रा. सावित्री पार्क वारणानगर, ता.हातकंणगले जि.कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.