पावसाळ्यात मॅगी नूडल्स खाण्याची मजाच न्यारी!

यंदा घरी बनवून पहा चवीने भरपूर

by Team Satara Today | published on : 10 July 2025


मॅगी हे भारतात मिळणारे एक इन्स्टंट नूडल आहे, याच्या चवीने भारतीयांनाच काय तर जगभरातील लोकांना वेड लावले आहे. पावसाळ्यात तर गरमा गरम मॅगी खाण्याची मजाच फार वेगळी असते. घरात काही बनवायला नसले किंवा झटपट स्नॅक्ससाठी काही खायचे असेल की सर्वांना दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगी नूडल्सची आठवण येऊ लागते.

झटपट तयार होणाऱ्या या मागील तुम्ही एक मजेदार ट्विस्ट देऊन याची चव आणखीन वाढवू शकता. आह आम्ही तुमच्यासाठी गार्लिक मॅगीची एक चवदार रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्ही एकदा चाखाल तर याच्या प्रेमातच पडाल. लसूणाचा खमंग सुवास, थोडं मसालेदार आणि थोडं झणझणीत अशी ही मॅगी खवय्यांच्या आवडीची आहे. ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर देखील ट्रेंड होत अशात एकदा तरी ही रेसिपी ट्राय करणं तर बनतच. चला तर मग पाहूया ही झटपट गार्लिक मॅगी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करूयात.

साहित्य

मॅगी नूडल्स – 1 पाकिट

मॅगी चव मसाला – 1 पाकिट

बारीक चिरलेला लसूण – 7-8 पाकळ्या

कांदा – 1 मध्यम, बारीक चिरून

टोमॅटो – 1 मध्यम, बारीक चिरून (ऐच्छिक)

हिरव्या मिरच्या – 1-2, बारीक चिरलेल्या

तूप किंवा तेल – 1-2 टेबलस्पून

पाणी – 1 ते 1.5 कप

चवीनुसार मीठ

हिंग (ऐच्छिक)

हळद – चिमूटभर

लसूण – ३ ते ४ पाकळ्या

कृती

गार्लिक मॅगी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करा आणि त्यात बारीक चिरलेला लसूण घाला. तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवा.

त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून मध्यम आचेवर परतवा. कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजवा.

टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतवा. त्यात थोडीशी हळद आणि हिंग घालून मिक्स करा. ही स्टेप ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असल्यास तुम्ही हे स्किप करू शकता.

आता त्यात 1 ते 1.5 कप पाणी घालून उकळा. उकळताना मॅगी मसाला आणि थोडं मीठ घाला.

पाणी उकळल्यानंतर मॅगी नूडल्स तोडून घाला. नीट मिक्स करून झाकण ठेवून 2-3 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.

मॅगी शिजल्यावर एकदा नीट ढवळा. वरून थोडं बटर किंवा कांदापात घालून सर्व्ह करा.

अधिक चवदारपणासाठी थोडा चीज किंवा चिली फ्लेक्स घालू शकता.

झणझणीत गार्लिक मॅगी तयार आहे, गरमागरम सर्व्ह करा आणि याच्या झणझणीत चवीची मजा लुटा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फक्त 6 दिवसांत निर्मात्यांना कोट्यवधीचा नफा देणारा चित्रपट; जुरासिक वर्ल्ड
पुढील बातमी
विद्यार्थी अपघात विमा योजना; नुकसान भरपाई जलद देणार

संबंधित बातम्या