सातारा : पाण्याचे बिल जास्त आल्याच्या कारणावरून जीवन प्राधिकरणाच्या महिला कर्मचाऱ्यांशी वादावादी करून तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे.
याप्रकरणी संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. दि. 18 मार्च दुपारी साडेचारच्या दरम्यान पाण्याचे जादा बिल आल्याच्या कारणावरून फिर्यादी महिलेच्या पतीशी माळवदे यांनी वाद घातला. फिर्यादी यांनी मध्यस्थी केली असता संबंधितांनी अश्लील हावभाव करून मला तुमच्याशी बोलायचे नाही असे म्हणून सदर महिलेला आक्षेपार्ह भाषा वापरली तसेच त्यांना शिवीगाळ व दम दाटी केली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे