सातारा : सातारा शहर परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी संभोगसह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पीडितेच्या आईने शहर पोलिसांत दिली आहे. गौरीश उर्फ गौरव शंकर फुलारे (रा. वनश्री कॉलनी कारंडवाडी,ता.. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी गौरव फुलारे याने १५ वर्षीय अल्पवयीन युवतीला तू मला आवडतेस. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. असे सांगून तिच्यावर अत्याचार केले. ऑगस्ट २०२५ ते आजपर्यंत अत्याचाराचा हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर अल्पवयीन युवती गर्भवती राहिली असल्याची कल्पना पीडितेच्या आईला समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.याबाबत आईने शहर पोलिसांत धाव घेत दि १७ रोजी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहे.