सातारा : पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारी एक वाजण्याच्या पूर्वी फुटका तलाव, सातारा येथे पाण्यात बुडल्याने प्रकाश विठ्ठल पारकर रा. शनिवार पेठ, सातारा यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक यादव करीत आहेत.