सातारा, दि. १५ : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन सेव्हन स्टारच्या पार्किगमध्ये एका युवकास अडवून सहा जणांनी दि. 13 रोजी दुपारी 3 वाजता कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार शिवथर येथील स्वयंम विजय साबळे हा त्याच्या गावी शिवथरला जाण्यासाठी सातारा एसटी स्टॅण्डवर दुपारी आला होता.
तो फलाट क्रमांक 2 वर एसटीची वाट बघत असताना त्याला तीन महिन्यापूर्वी सुमित पवार, साहिल बामणे (दोघे रा. करंजे) यांच्यासोबत सेव्हन स्टार इमारतीच्यासमोर झालेल्या भांडणावरुन सुमित पवार, साहिल बामणे (दोघे, रा. करंजे), गौरव सावंत (रा. एकसळ), आदित्य (रा,. कोरेगाव), यश मांढरे, प्रज्वल यांनी स्वयंमला सेव्हनस्टारच्या पार्किंगमध्ये आणून कोयत्याने आणि हाताबुक्यांनी मारहाण केली. या गुन्ह्याचा तपास हवालदार मेचकर हे करत आहेत.