सैनिक स्कूलच्या प्रवेश प्रक्रीयेस ९ नोंव्हेबर पर्यंत मुदतवाढ; इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला मुलींना सुवर्णसंधी

by Team Satara Today | published on : 08 November 2025


सातारा :  शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या इयत्ता सहावी व इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरणे सुरू झाले आहे. इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला मुलींना सुवर्णसंधी आहे.

याकरिता विद्यार्थ्यांचे वय दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत 10 ते 12 वर्ष असावे. तर इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिता दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत त्या विद्यार्थ्यांचे वय 13 ते 15 या दरम्यान असावे, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची दिनांक 10 ऑक्टोबर ते ९ नोंव्हेबर २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेश फॉर्म ऑनलाइन भरावेत तसेच कोणत्याही प्रकारच्या शंका अगर अडचणी असतील तर आपण https://exams.nta.nic.in/sainik-school-society/ या संकेत स्थळाला भेट द्यावी. आपल्या पाल्याचा प्रवेश परीक्षेचा फॉर्म लवकरात लवकर भरावा या सुवर्णसंधीचा फायदा जास्तीत जास्त पालकांनी घ्यावा असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हास्तर युवा महोत्सव व विकसित भारत चॅलेंज ट्रॅकचे जानेवारीमध्ये आयोजन
पुढील बातमी
महायुतीवर चर्चा होईल, पण कराडचा नगराध्यक्ष महायुतीचा व्हावा : आ. अतुल भोसले ; मित्रपक्षांनी मदत करावी

संबंधित बातम्या