सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्यानिमित्त शुक्रवार दि. ३० रोजी गुजराथी महाजन मंगल कार्यालय, मंगळवार पेठ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजमाता अहिल्यादेवी होळकर महोत्सव पठार विभाग अध्यक्ष संजय शेडगे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्यानिमित्त दि. ३० रोजी सायंकाळी ४ वाजता अभिनेता योगेश कुंभार प्रस्तुत सुरभी हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफिल, सायंकाळी ६ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिमा पूजन, रात्री ७ वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार, रात्री ८ वाजता प्रमुख व्याख्याते संतोष ठोंबरे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारावर व्याख्यान होणार आहे. सदर कार्यक्रमास खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, इंदौर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर, माजी जि.प. सदस्य राजू भोसले, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील, डॉ. रोहित कोळेकर, बाळासाहेब थोरात, अशोक शेडगे, बाळकृष्ण गावडे, राजू गोरे, हनुमंत चौरे, अंकुश भांड, बालाजी शिंदे, टी. आर. गारळे, दादासाहेब काळे, डॉ. प्रवीणकुमार जरग, सुभाषराव येळे, नंदू माने, संतोष कोळेकर, भरत खरात, अशोक साळुंखे, शक्ती बरकडे, पांडुरंग पिसे, नानासाहेब सोनवलकर, स्नेहल सोनकाटे, तृप्ती फडतरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेडगे यांनी केले आहे.