दारुसाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण

by Team Satara Today | published on : 25 April 2025


सातारा : दारुसाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नजीम इब्राहीम पठाण (रा. माची पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. येथील शनिवार चौकात दि. 23 रोजी रात्री 9 च्या सुमारास मयूर भोसले (पूर्ण नाव नाही, रा. करंजे, सातारा) आणि इतर दोघांनी फिर्यादीस मारहाण केली. संशयित मयूर भोसले हा तक्रारदारा यांना दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. पण, तक्रारदारांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. यामुळे संशयित भोसले आणि इतर दोघांनी हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक आमते तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गाडीची काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी तीनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
तिघांना मारहाण केल्याप्रकरणी आठजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या