सातारा : सातारा शहर परिसरात दोन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापे टाकून तिघांवर गुन्हे दाखल केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाडा परिसरात छापा टाकून सचिन साहेबराव निकम (वय 41, रा. सोमवार पेठ, सातारा), अमिन पटेल (वय 42, रा.तेली खड्डा परिसर, सातारा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 हजार 380 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
दुसरी कारवाई मल्हार पेठ, सतारा येथे सुशांत संदीप ढवळे (वय 28, रा. फुटका तलाव परिसर, सातारा) याच्यावर केली. पोलिसांनी त्याच्याकडून 550 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.